बेलकुंड : औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण टाका पाटीजवळ एकमेकांना धडकलेली कार आणि दुचाकी. 
लातूर

Latur Ausa Tuljapur highway accident deaths | औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, काका-पुतण्या ठार

Latur Ausa Tuljapur highway accident deaths - भाचा गंभीर जखमी, कारची दुचाकीला जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

बेलकुंड : औसा-

तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा तालुक्यातील टाका पाटीजवळ रविवारी (दि. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील तायप्पा दिगंबर बंडगर (वय ३८) आणि ओंकार गोपाळ बंडगर (वय २४) या काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला भाचा मारुती दंडे (वय २४) गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त पुण्याहून गावी आलेल्या तायप्पा बंडगर यांचा अपघातात मृत्यू झाल्याने तावशी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, तावशी येथील तायप्पा बंडगर, ओंकार बंडगर आणि मारुती दंडे हे तिघे एमएच २४ सीए १२०३ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेताकडून गावाकडे जात होते. दरम्यान, औसाच्या दिशेने जाणाऱ्या एमएच १२ केवाय ९४५२ क्रमांकाच्या कारची त्यांच्या दुचाकीला टाका पाटीजवळ जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यात तायप्पा आणि ओंकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मारुती दंडे गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि भादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मारुती दंडे याला रुग्णवाहिकेतून लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT