Accident file photo
लातूर

Latur accident news | भरधाव कारच्या धडकेत अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा मृत्यू

एक गंभीर जखमी; चामरगा पाटीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ : येथिल पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प विभागातील दोन अंगणवाडी पर्यवेक्षिका स्कुटीवरून अंगणवाडी तपासणीसाठी जात असताना भरधाव कारच्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात एका पर्यवेक्षिकेचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना उदगीर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील चामरगा पाटीजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी पर्यवेक्षिका तनुजा घोडके (शिंदे) व अनुसया खलंग्रे या चामरगा येथील अंगणवाडीची तपासणी करून डिगोळ येथील अंगणवाडीकडे स्कुटीवरून जात होत्या. यावेळी चामरगा पाटीजवळ थांबलेल्या बसच्या बाजूने पुढे जात असताना उदगीरकडून लातूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ५५ बी ०१३९ क्रमांकाच्या कारने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तनुजा घोडके यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, लातूर येथे हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या अनुसया खलंग्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत तनुजा घोडके यांच्या पश्चात पती, पाच वर्षांचा मुलगा, सासू-सासरे तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे महिला व बाल विकास विभागात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. शिरूर अनंतपाळ पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT