Amravati Accident | लोणीजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, आई व मुलगा जखमी

अमरावती-अकोला मार्गावरील लोणी गावाजवळ भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक
Amravati Loni Car Bike Crash
मरावती-अकोला मार्गावरील लोणी गावाजवळ भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक दिलीPudhari
Published on
Updated on

Loni Car Bike Crash

अमरावती: अमरावती-अकोला मार्गावरील लोणी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आई आणि मुलगा जखमी आहेत. ही घटना गुरुवारी (दि.२१) घडली. मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद नौशाद कुरेशी (वय ४०, रा. ताजनगर, अमरावती) असे असून जखमींमध्ये त्यांची पत्नी गुलनाज अंजुम मोहम्मद नौशाद (वय ३५) आणि मुलगा मोहम्मद अबदान (वय ८) यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नौशाद हे पत्नीसमवेत मुलाला आणण्यासाठी सोनेरी येथील मदरशात गेले होते. तेथून तिघेही दुचाकी एम एच २७ डीएन २०८९ ने अमरावतीकडे परतत असताना लोणी गावाजवळ पाठीमागून येणार्‍या एमएच-०५-सीएम-३९०० क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Amravati Loni Car Bike Crash
Amravati News | वरुड तालुक्यात हृदयद्रावक दुर्घटना : पुसली धरणात तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू 

हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धडकेनंतर तिघेही रस्त्यावर फेकले गेले. मोहम्मद नौशाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस स्टेशन चे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news