Latur News : लातूर शहरातील ११ जलकुंभांची पाहणी file photo
लातूर

Latur News : लातूर शहरातील ११ जलकुंभांची पाहणी

या पाहणीदरम्यान प्रत्येक जलकुंभाचे दैनंदिन व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्था आणि येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Inspection of 11 water tanks in Latur city

लातूर, पुढारी वृत्तसेवाः शहरातील उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पुढील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर आणि महानगरपालिका उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी बुधवारी सकाळी ७वाजल्यापासून शहरातील ११ जलकुंभांची पाहणी केली.

बसंबंधित जलकुंभातून नियोजित भागात वेळेवर पाणीपुरवठा होत आहे की नाही, याचीही खातरजमा करण्यात आली. पाणीपुरवठा सुरू असलेल्या विविध प्रभागांना प्रत्यक्ष भेट देऊन नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळत आहे का, याची पाहणी करण्यात आली.

यावेळी अधिकाऱ्यांनी नळाला येणारे पाणी पिऊन त्याची खात्री केली. तसेच जलकुंभातून पाणी सोडण्यात आलेल्या भागांमध्ये नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. काही नागरिकांकडून विनाकारण पाणी वाया घालविले जात असल्याचे निदर्शनास आले.

रस्त्यावर पाणी सोडणे, वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणे टाळावे आणि उपलब्ध पाण्याची बचत करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. पाहणीवेळी कार्यकारी अभियंता गणेश देवणीकर, कनिष्ठ अभियंते क्षितिज कटके, प्रविण चव्हाण, जलकुंभ प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT