Latur News : आजारपणातही जनतेची चिंता; आ. कराड पुन्हा संवादात

तब्बल महिन्यानंतर कार्यकर्त्यांची भेट; दुष्काळ, पाणी, चारा अन् पंचनाम्यांचा घेतला आढावा
Latur News
Latur News : आजारपणातही जनतेची चिंता; आ. कराड पुन्हा संवादातfile photo
Published on: 
Updated on: 

MLA Rameshappa Karad reviewed the drought situation while interacting with the workers

लातूर, पुढारी वृत्तसेवा : हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितलेली असतानाही लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. तब्बल महिनाभरानंतर कार्यकर्त्यांची भेट झाल्याने या भेटीत आपुलकीचा आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

Latur News
Latur News : निलंग्यात ८ ऑक्टोबरला 'व्होट बचाव, देश बचाव' मोर्चा

मधुमेह आणि हृदयाच्या त्रासामुळे आमदार कराड यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर ते शुक्रवारी लातूरला परतले. मात्र, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने गेल्या महिनाभरापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटही झाली नव्हती.

मात्र, मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि जनतेच्या अडचणींची चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सोमवारी सायंकाळी 'प्रयाग' याग' निवासस्थानी त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विविध गावांतील पिण्याच्या पाण्याची स्थिती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शासकीय पंचनामे सुरू आहेत का, सोयाबीनची काढणी सुरू झाली का, याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली.

Latur News
Latur News | चाकूरच्या पाणीटंचाईवर प्रशासन ॲक्शन मोडवर; अवैध पाणी उपशावर कारवाईचे निर्देश

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ, बसवराज पाटील, आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांनी दूरध्वनीवरून कराड यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी कराड परिवारातील सदस्यांसह लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा

'प्रकृती अस्वस्थ असल्याने प्रत्यक्ष गावागावात जाता येत नाही. जनतेशी संवाद साधता येत नाही,' अशी खंत व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना दुष्काळाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. शासनाच्या दुष्काळी योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news