पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले pudhari photo
लातूर

लातूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करून घ्यावे : पालकमंत्री

रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

पुढारी वृत्तसेवा

Fire audit, structural audit of government hospitals in Latur district should be done immediately: Guardian Minister

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. या रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

पालकमंत्री भोसले यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिटविधायक कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

िलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयात अग्निशमन विरोधी आवश्यक उपाययोजना करा. सर्वत्र अग्निशमन यंत्र (फायर एक्सर्टिग्विशर) कार्यान्वित असल्याची व मुदतीत रिफिल केले जात असल्याची खात्री करावी. ही यंत्रणा हाताळण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.

शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी रुग्णालयात, विशेषतः आयसीयू आणि ज्याठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर ठेवल्या जाणाऱ्या कक्षात अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म तपासणी करून अधिक सक्षमपणे कार्यान्वित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री भोसले यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. मोहिते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT