Nilanga Gharkul Scheme | घरकुल यादीतून बोटकुळच्या लाभार्थ्यांची नावे गायब; पैसे घेतल्याचा आरोप, गावकऱ्यांचा संताप

सर्वेक्षणावेळी प्रत्येकी एक ते दोन हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप
Nilanga Botkul Beneficiary Gharkul List Allegations
संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली.Pudhari
Published on
Updated on

Nilanga Botkul Beneficiary Gharkul List Allegations

निलंगा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2025-26 च्या सर्वेक्षणानंतरही निलंगा तालुक्यातील बोटकुळ येथील एकाही पात्र लाभार्थ्याचे नाव अंतिम यादीत न आल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वेक्षणावेळी प्रत्येकी एक ते दोन हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप विस्तार अधिकाऱ्यांवर करत संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. न्याय न मिळाल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, 2025-26 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वेक्षण विस्तार अधिकारी हांडे यांच्या नियंत्रणाखाली झाले. सर्वेक्षणादरम्यान लाभार्थ्यांकडून प्रत्येकी एक ते दोन हजार रुपये रोख घेतले गेले आणि घरकुल यादीत नाव समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर एकाही लाभार्थ्याचे नाव समोर न आल्याने गावकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nilanga Botkul Beneficiary Gharkul List Allegations
Latur News : अहिल्यादेवींच्या नावाने कर्जमुक्ती योजना; बॅनरवर मात्र त्यांचाच फोटो गायब!

याबाबत विचारणा केली असता "14 ऑगस्ट 2026 रोजी यादी अद्ययावत करण्यात आली असून नावे येतील," असे उडवाउडवीचे उत्तर दिले जात असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यादी कोणत्या निकषांवर तयार करण्यात आली आणि पात्र लाभार्थ्यांची नावे का वगळली, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जर त्यांची नावे यादीत अपलोड झाली असतील तर त्याची अधिकृत पावती द्यावी; अन्यथा घेतल्याचा आरोप असलेले पैसे परत करावेत. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व पात्र लाभार्थी पंचायत समिती निलंगा येथे आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news