Latur News : खांडवी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मैदानावर अतिक्रमण file photo
लातूर

Latur News : खांडवी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मैदानावर अतिक्रमण

जागा खुली न केल्यास थेट रस्त्यावर प्रार्थना व राष्ट्रगीत

पुढारी वृत्तसेवा

Encroachment on the grounds of the Khandvi Zilla Parishad Central School

परतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खांडवी येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या मालकीच्या मैदानावर तार कंपाउंड करून अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीने केला आहे. अतिक्रमण हटवून शाळेचे प्रांगण कायदेशीररीत्या खुले न केल्यास शाळेची दैनंदिन प्रार्थना व राष्ट्रगीत थेट परतूर-टाकळी रंगोपंत मुख्य रस्त्यावर घेण्यात येईल, असा इशारा समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात खांडवी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यात म्हटले, की जि. प. केंद्र प्राथमिक शाळा खांडवीच्या खुले मैदानाची शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर लोकवर्गणीतून, तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या हस्ते २ लाख ५० हजार रुपयांत कायमस्वरूपी खरेदी करण्यात आली होती.

मात्र, ज्यांनी ही जागा लिहून दिली, त्यांनीच आता त्या जागेवर तार कंपाउंड उभारून ताबा घेतल्याचा आरोप शालेय समितीने केला आहे. खांडवीसह सिरसगाव, टाकळी रंगोपंत, उस्मानपूर आणि पिंपुळा अशा पाच-सहा गावांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. मैदानच नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, तार कंपाउंड व खांबांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्ता बरकुले, उपाध्यक्ष रामेश्वर बरकुले यांच्यासह सदस्य उत्तम साळवे, लक्ष्मण सराटे, दिगांबर बरकुले, शाम माने, अनसार शेख, दत्ता बरकुले, सुमेध साळवे आणि विठ्ठल सोळुंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT