Latur Sugarcane Rate Protest : ऊस काटामारीविरोधात संघर्ष समिती आक्रमक

सर्व कारखान्यांचे वजनकाटे दरमहा तपासण्याची मागणी
Latur Sugarcane Rate Protest
Latur Sugarcane Rate Protestpudhari photo
Published on: 
Updated on: 

लातूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस वजनात काटामारी होत असल्याचा आरोप करत ऊस दरवाढ संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत केवळ दोन कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी झाली आहे. उर्वरित ११ कारखान्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष का, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.

यासंदर्भात सोमवारी (दि. २३) समितीच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनांच्या जिल्हाध्यक्षांनी वैधमापनशास्त्र विभागाचे लातूर व धाराशिव जिल्ह्याचे उपनियंत्रक अ. ध. गेटमे यांना निवेदन दिले.शेतकऱ्यांनी खासगी वजनकाट्यावर ऊसाचे वजन करून आणल्यास अनेक कारखाने ते वजन ग्राह्य धरत नाहीत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Latur Sugarcane Rate Protest
Latur Crime : सोयाबीन चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; ८ गुन्हे उघड

खासगी आणि कारखान्यांच्या वजनकाट्यांत तफावत आढळत असतानाही कारखान्यांच्या कारवाईच्या भीतीने शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. वैधमापनशास्त्र नियमांनुसार प्रमाणित खासगी काट्यावरील वजन नाकारणे अनुचित असल्याचा अभिप्राय राज्याच्या नियंत्रकांनी दिल्याचेही समितीने नमूद केले आहे.

गळीत हंगामातील चार महिन्यांत भरारी पथकांमार्फत प्रत्येक कारखान्याच्या वजनकाट्यांची दरमहा तपासणी करावी, या प्रक्रियेत शेतकरी व समितीच्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे आणि खासगी काट्यावरील वजन ग्राह्य धरण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

विभागाने तातडीने कारवाई न केल्यास समिती, विविध संघटना आणि शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.निवेदनावर संतोष नागरगोजे, राजाभाऊ चौगुले, नंदकिशोर साळुंखे, अरुणदादा कुलकर्णी, अजित जनार्धन घंटेवाड, कुलदीप सूर्यवंशी आणि सत्तार पटेल यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Latur Sugarcane Rate Protest
Sambhajinagar Water Scarcity : टँकरच्या उंबरठ्यावर ३५ गावे ८१ गाव-तांड्यांवर पाणीबाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.