Double murder over farm access road dispute
लातूर, पुढारी वृत्तसेवा : पाणंद रस्त्याच्या वादातून डांगेवाडी (ता. शिरूर अनंतपाळ) येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू, तर चौघे जखमी झालेल्या प्रकरणात निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल २९ सप्टेंबर रोजी सुनावण्यात आला.
३ ऑक्टोबर २०१९ रोजी डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या कारणावरून शेतात काम करणाऱ्या सुभाष दयानंद सुडे, दयानंद नामदेव सुडे व अन्य व्यक्तींवर हल्ला झाला होता. यात सुभाष सुडे व दयानंद सुडे यांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले होते. याप्रकरणी नामदेव सुभाष सुडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी व जखमींचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि अन्य सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षाने १४ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी, जखमी साक्षीदार आणि जप्ती पंचांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. पवार यांनी ज्ञानोबा अंगद ओनामे, जगन्नाथ विश्वंभर ओनामे, राजकुमार विश्वंभर ओनामे, राम बाबुराव ओनामे आणि भागवत बाबुराव ओनामे (सर्व रा. डांगेवाडी) यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रत्येक आरोपीला ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, तसेच अन्य कलमांनुसारही कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर यांनी बाजू मांडली.
त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. अभियोगास अॅड. सी. जे. सबनीस पाटील यांनी सहाय्य केले. कार्यालयीन कामकाजासाठी एच. जी. बिरादार व कोर्ट पैरवी कर्मचारी ए. जी. कांबळे यांनी सहकार्य