Latur News | लातूरात सहा संशयित सावकारांवर एकाचवेळी छापे!

धनादेश, खरेदीखतांसह कर्ज व्यवहारांची कागदपत्रे जप्त; सहकार विभागाची कारवाई
Latur News
Latur News Pudhari
Published on: 
Updated on: 

लातूर : अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने सोमवारी लातूर शहरातील सहा संशयित सावकारांच्या घरांसह इतर संशयित ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत धनादेश, खरेदीखत, कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे तसेच अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. लातूरचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक रवि गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच स्वतंत्र पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली.

डी. बी. कांबळे, पराग देशमुख, जे. एस. चिल्ले, एस. जे. जाधव आणि अंकुश धुमाळ यांच्या पथकांनी संबंधित ठिकाणी छापे टाकले.जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची व साहित्याची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत अवैध सावकारीचे पुरावे आढळल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांतर्गत संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.लातूर तालुक्यात अवैध सावकारीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लातूर कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक रवि गडेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news