Chakur Crime | ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण; ५ ऑक्टोबरपासून काम बंदचा इशारा

चाकूर तालुक्यातील झरी बु. येथे जेसीबी व ट्रॅक्टर मालकाने शिवीगाळ, अरेरावी करत मारहाण केल्याचा प्रकार
Chakur  Gram Revenue Officer Assault
Chakur Gram Revenue Officer Assault Pudhari
Published on: 
Updated on: 

Chakur Gram Revenue Officer Assault

चाकूर : तालुक्यातील झरी बु. येथे शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्राम महसूल अधिकारी मुकिंद पांडुरंग सुडके यांना जेसीबी व ट्रॅक्टर मालकाने शिवीगाळ, अरेरावी करत मारहाण केल्याचा प्रकार घडला. तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करून तातडीने अटक करावी, या मागणीसाठी चाकूर तालुका तलाठी संघटनेने ५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात संघटनेने तहसीलदारांना निवेदन देऊन घटनेची तातडीने व सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Chakur  Gram Revenue Officer Assault
Latur News | लातूरात सहा संशयित सावकारांवर एकाचवेळी छापे!

नैसर्गिक आपत्ती, पीक पाहणी, पंचनामे यांसारखी क्षेत्रीय कामे करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव, धमकी अथवा मारहाणीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने स्पष्ट निर्देश जारी करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपातळीवरील नैसर्गिक आपत्तीशी संबंधित कामांचा आढावा कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी या त्रिसदस्यीय समितीच्या सामूहिक जबाबदारीच्या आधारे घ्यावा. केवळ ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव आणू नये, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

Chakur  Gram Revenue Officer Assault
Latur News : दुष्काळात जपलेला तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

या प्रकरणात तातडीने कारवाई करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून न दिल्यास ५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने निवेदनातून दिला आहे.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष पी. व्ही. पल्ले यांच्यासह एस. एम. शेळके, एम. बी. सुडके, एस. एम. गुंडरे, व्ही. डी. कुटवाडे, आर. डी. गायकवाड, पी. व्ही. जाधव, एस. आर. सूर्यवंशी, एन. के. गायकवाड, डी. ए. मोरे, एस. एच. गिरी, एस. एन. मुंढे, हंगरगे एस. एस. तसेच एम. एम. होळंबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news