Latur News : पाच कोटी खर्चुनही उजेड-अंकुलगा रस्ता खड्ड्यांत ! file photo
लातूर

Latur News : पाच कोटी खर्चुनही उजेड-अंकुलगा रस्ता खड्ड्यांत !

कामाची मुदत उलटली; पुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न, दोषींवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Despite an expenditure of five crore rupees, the Ujed-Ankulga road is full of potholes!

शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उजेड ते अंकुलगा राणी या दहा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था कायम असून, सुमारे पाच कोटी ८० लाख रुपये खर्च करूनही प्रवाशांच्या हालअपेष्टा थांबलेल्या नाहीत. एप्रिल २०२४ मध्ये सुरू झालेले हे काम बारा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित मुदत उलटून गेल्यानंतरही काम अपूर्ण असल्याने सार्वजनिक निधी खर्चुनही नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

रस्त्याच्या बांधकामात तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मातीचा थर पूर्णपणे न काढता काम केले जात असल्याने डांबरीकरणाची गुणवत्ता घसरत असून, काही ठिकाणी रस्ता उखडू लागला आहे. कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्री व मजुरांची नियमित उपलब्धता नसल्याने कामाचा वेगही मंदावला आहे.

अर्धवट खडीकरणामुळे वाहनांच्या वर्दळीत खडी पसरून पुन्हा खड्डे तयार होत परिणामी दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघातांत काही प्रवासी जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शेतीमालाची वाहतूक आणि रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, मार्गावरील काही जुन्या पुलांना मोठ्या भेगा व भगदाडे पडली आहेत. पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असतानाही कायमस्वरूपी दुरुस्तीऐवजी वरवरची मलमपट्टी केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, बांधकामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी, पुलांची सुरक्षितता तपासून आवश्यक तेथे नव्याने बांधकाम करावे आणि दोषी ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वैशंपायन जागले, शरद साळुंके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT