Latur News : व्हॉल्व्ह खराब करून जलवाहिनीचे पाणी शेतात वळविले

गुन्हा दाखल; अनधिकृत नळजोडणीवरही महानगरपालिकेची कारवाई
Latur News
Latur News : व्हॉल्व्ह खराब करून जलवाहिनीचे पाणी शेतात वळविलेfile photo
Published on: 
Updated on: 

The valve was damaged to divert water from the pipeline into the fields

लातूर, पुढारी वृत्तसेवा : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाण्याची चोरी व अपव्यय - रोखण्यासाठी लातूर महानगरपालिकेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. धनेगाव मांजरा धरण ते हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रादरम्यानच्या मुख्य - जलवाहिनीच्या व्हॉल्व्हचे नुकसान करून पाणी शेतात वळविल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने जलवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Latur News
Latur News : ऊस संघर्ष समितीची बैठक; मनसे, प्रहारसह शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र ते धनेगाव धरणादरम्यान मुख्य जलवाहिनीची पाहणी करताना मौजे गाधवड शिवारातील व्हॉल्व्हचे नुकसान झाल्याचे आढळले. संबंधित शेतकऱ्याने व्हॉल्व्ह खराब करून जलवाहिनीतील पाणी शेतात वळविल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी मनपाचे कनिष्ठ अभियंता अभिजीत राठोड यांच्या पथकाने मुरूड पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, कार्यकारी अभियंता गणेश देवणीकर यांच्या पथकाने अनधिकृत नळजोडण्यांची तपासणी केली.

Latur News
Water scarcity : शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

यावेळी एक अनधिकृत जोडणी खंडित करून पाणी उपसा करणारी मोटार जप्त करण्यात आली. संबंधित मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पाण्याची टाकी ओसंडून पाणी वाया घालविणे, पिण्याचे पाणी रस्त्यावर मारणे, अनधिकृत जोडणी व मोटारीद्वारे पाणी उपसा करणे अशा प्रकारांसाठीही पाच हजार रुपये दंडाची, तरतूद करण्यात आली आहे. मुख्य जलवाहिनीचे नुकसान किंवा पाणीचोरी आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.