Cyber Fraud : सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा file photo
लातूर

Cyber Fraud : सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा

पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Contact 1930 in case of cyber fraud

लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : बनावट कॉल, फिशिंग लिंक, बनावट बँक संदेश आणि सोशल मीडियावरील फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले. ओटीपी, सीव्हीव्ही, एटीएम पिन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. सायबर गुन्ह्याचा बळी ठरल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू महाविद्यालयात सायबर गुन्हेगारी जनजागृती अभियानांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे व न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील सोमवंशी उपस्थित होते.

पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी अनोळखी मोबाईल वापरणे टाळावे, सापडलेला मोबाईल पोलिसांकडे जमा करावा तसेच मोबाईलचा पासवर्ड व वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असा सल्ला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT