Schoolgirls Safety : शालेय मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सज्ज

छेडछाड करणाऱ्यांची आता खैर नाही - सपोनि मोरे; विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी
Schoolgirls Safety
Schoolgirls Safety : शालेय मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सज्जfile photo
Published on
Updated on

Police administration geared up for the safety of schoolgirls

पैठण, पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी पोलिस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारलेले सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी आपल्या कार्यपद्धतीची सुरुवात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केली आहे. त्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा र परिषद शाळा तसेच खासगी शाळा, महाविद्यालये व विद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. मुलींनी शाळा व महाविद्यालयात येता-जाता कोणतीही भीती बाळगू नये, आत्मविश्वासाने शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादित करावे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. समाजकंटकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे सपोनि भरत मोरे म्हणाले.

Schoolgirls Safety
धर्माबादमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूकता इशारा; पालक व नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान

नुकतेच शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळा-महाविद्यालयांत सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी मुर्तीच्या शिक्षणासह सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. . एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा वाहेगाव, ढोरकीन, बालानगर, पिंपळवाडी, ढाकेफळ, अमरापूर, बोरगाव, टाकळी, कारकीन, मुधलवाडी, नारायणगाव, जायकवाडी तसेच खासगी विद्यालय सरस्वती भवन बालानगर, शाहू विद्यालय जायकवाडी, भीमाशंकर विद्यालय कारखानासह परिसरातील आदी शाळा महाविद्यालयाला सपोनि भरत मोरे, पीएसआय दशरथ बुरकुल, गोपनीय शाखेचे उगलेंसह हद्दीतील सर्व बीट अंमलदार यांना शाळेला भेटी देऊन मुलींना आधार देण्याचं काम पोलिस ठाण्याच्या माध्यमातून सुरुवात आहे. तसेच गुड टच, बॅड टच, मुलींना महिला कायद्याविषयी माहिती, डायल ११२ यासंबंधी माहिती दिली आहे.

Schoolgirls Safety
Sambhajinagar News : लाचखोरी प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह अंमलदार ACBच्या जाळ्यात

सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक

मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा थेट विद्यार्थिनींशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू आहे. छेडछाड, पाठलाग किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. मोबाईल तसेच सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करावा, रोडरोमिओंवर कठोर कारवाई करून सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाणे कटिबद्ध असल्याचे पोलिस निरीक्षक भरत मोरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news