मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मनपावर भाजपाचा अभिनव मोर्चा pudhari photo
लातूर

Latur stray dog menace : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मनपावर भाजपाचा अभिनव मोर्चा

मोकाट कुत्र्यांसह मनपाला पिंजरा भेट; हाड हाडच्या घोषणांनी वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हे कुत्रे अनेकांच्या जीवावर उठले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज शहर भाजपाच्या वतीने महापालिकेस चार मोकाट कुत्र्यांसह हाड हाड अशा घोषणा देत मोर्चा काढून महापालिकेस पिंजरा भेट देण्यात आला.

मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांच्या हातात कुत्र्याचे चित्र असलेले व प्रशासन जागे व्हा, नागरीकांना न्याय द्या, मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढतोय प्रशासन कुठे आहे असा मजकूर असलेले फलक होते. हाड, हाड अशा घोषणा ते देत होते. लातूर शहरामध्ये मोकाट कुत्रे चावल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हे कुत्रे सरळ अंगावर धावून येत आहेत. प्रसंगी चावे घेत आहेत.

याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांना होत आहेत. त्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी होत आहेत. येथील फळ बाजारात एकाव्यक्तीवर अवेक मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांनी त्याचे प्रेतपालिकेच्या दारात आणून ठेवले होते.

पालिका प्रशासनाने त्यावेळी त्यांना मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू अशी हमी दिली होती. तरीही त्यासाठी महापालिकाही प्रयत्न करत नाही म्हणून आज भाजपाचे शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते देवीदास काळे, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी महापालिकेवर चार मोकाट कुत्रे एका पिंजऱ्यात बंद करून तो पिंजरा महापालिकेच्या दालनात नेऊन ठेवला.

जोरदार घोषणा देत पालिकेने मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तात्काळ पाऊले उचलावीत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. नगरसेवक, सहभागी पदाधिकारी, का मोर्चा आल्याने अधिकारी, कर्मचारी हा नेमका काय प्रकार आहे हे पाहत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT