Banjara community march for S. T. reservation
लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचे (एस. टी.) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लातूर शहरात आज सकल बंजारासमाजाच्यावतीने सोमवारी (दि.६) भव्य मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानातून निघालेल्या या मोर्चाचा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप झाला. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे त्या गॅझेटची अंमलबजावणी महाराष्ट्रातही व्हावी आणि समाजाला एस. टी. आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच लातूर शहरात बंजारा बांधव व भगिनी या मोर्चासाठी येत होते. बंजारा समाजांच्या बांधवांनी मी बंजारा असा मजकूर असलेल्या पांढऱ्या टोप्या परीधान केल्या होत्या. बंजारा भिगीनींनी पारंपारीक वेषात आपला सहभाग नोंदवला होता. त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता त्यांच्या हातात मागण्यांचे फलक होते.
"बंजारा समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा" असे फलक दिसून येत होते. या मोर्चात तरुणांचा उत्साह आणि महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. शांततेत पण ठाम निर्धाराने निघालेल्या या मोर्चातून समाजाने आपल्या न्याय्य हक्कासाठीचा आवाज बुलंद केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोराप या मोर्चास अनेकांनी संबाधीत केले. देशातील अन्य राज्यांचा दाखला देत महाराष्ट्रात बंजारा समाजाप्रति होत असलेला दुजाभावाबद्दल यावेळी वकत्यांनी नाराजी व्यक्त केली व बंजारा समाजाची ही मागणी मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला.