Latur News : आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अतिवृष्टी बाधितांना ९० लाखांची मदत

लातूर : राज्यातला पहिला प्रयोग, दिवाळीपूर्वी दिलासा
Latur News
Latur News : आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून अतिवृष्टी बाधितांना ९० लाखांची मदत File Photo
Published on
Updated on

MLA Abhimanyu Pawar provides Rs 90 lakh assistance to those affected by heavy rains

लातूर पुढारी वृतसेवा: ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झाल ल्या अतिवृष्टीने औसा मतदारसंघावर आभाळ फाटले. या आपत्तीने भरडलेल्या नागरिकांना शासन मदत करीतच आहे त्यात भर म्हणून आमदार अभिन्यू पवार यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेत "विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा" या भावनेतून सुमारे ९० लाख रुपयांची थेट अतिवृष्टी बाधीत नागरीकांसाठी जाहीर केली आहे. अशा प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात पहिलाच असून तो राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.

Latur News
Latur News : मनपा आयुक्तांकडून शहरात विविध ठिकाणांची पाहणी

ही मदत क्रिएटीव्ह फाऊंडेशन आणि अभय भुतडा फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली जाणार असून, मिळणाऱ्या नुकसानभरपाई इतकीच रक्कम आमदार शासनाकडून अभिमन्यू पवार यांच्या वतीने देखील दिली जाणार आहे.

म्हणजेच, शासन जितकी मदत देईल, तितकीच मदत आ. अभिमन्यू पवार सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून देतील, असा राजकीय नव्हे तर सामाजिक जाणिवेचा नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून ४ लाख व आ. अभिमन्यू पवारांकडूनही ४ लाख एकूण ८ लाख रुपये मिळणार आहेत. बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या ३२ हजार रुपयांइतकीच रक्कम आ. पवारांकडून गाय/म्हैस दगावल्यास शासनाच्या ३७.५ हजार रुपयांइतकीच मदत पवारांकडून दिली जाणार आहे.

Latur News
Raju Shetti : दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास आंदोलन

तसेच, वासरू, शेळी, कोंबड्या, घर पडणे किंवा घरात पाणी घुसणे अशा सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी शासन जितकी मदत देईल, तितकीच भरपाई आ. पवार देणार आहेत.

एकूण ११२५ कुटुंबांना ही मदत मिळणार असून, दिवाळीपूर्वी विजय मंगल कार्यालय, औसा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करून 'कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश व फूड पॅकेट्सचे वितरण होणार आहे. ही मदत पंचनाम्यावर आधारित असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे.

निर्मळ हेतू

यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी ज्यासाठी मदत मिळते, त्याच हेतूसाठी तिचा वापर व्हावा अशी साद घालून सांगितले की, बैल दगावला असेल, तर मदतीने पुन्हा बैलच खरेदी करावा; गाय/म्हैस दगावली असेल तर तीच पुन्हा घ्यावी हाच माणुसकीचा खरा अर्थ आहे. पीक आणि जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय नुकसानभरपाई वाढवण्याचा पाठपुरावाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातला पहिलाच प्रयोग

समाजहितेषी कार्यक्रमातून राज्यस्तरावर आपले वेगळेपण सिध्द करणारे लोकप्रतिनिधी असी आमदार अभिमन्यू पवार यांची ओळख सर्वश्रुत आहे. त्यांचा शेत रस्त्याचा पॅर्टन राज्याला दिशादर्शक ठरला आहे. त्यांनी मतदारसंघातील अतिवृष्टीने बाधीत झालेल्या नागरीकांसाठी जाहीर केलेली उपरोक्त मदत ही मानुसकीचा वस्तुपाठ असून एका लोकप्रतिनिधीने केलेला हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून तो राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news