शिरूरअनंतपाळ तालुक्यात एसटीच्या काही चालक-वाहकांची मनमानी File Photo
लातूर

शिरूरअनंतपाळ तालुक्यात एसटीच्या काही चालक-वाहकांची मनमानी

प्रवाशांशी उद्धट वर्तन; नागरिकांतून नाराजी

पुढारी वृत्तसेवा

Arbitrary behavior of some ST drivers and conductors in Shirur-Anantapal taluka

शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : एस.टी. महामंडळाचे प्रवासी आमचे दैवत आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा हे धोरण असताना तालुक्यातील काही मुक्कामी बसच्या चालक-वाहकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अपंग, वृद्ध आणि महिलांना चढ-उतार करताना मदत करण्याऐवजी काही कर्मचारी त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात निलंगा, लातूर, औसा आदी मार्गावरील काही एस.टी. बस मुक्कामी राहत असतात. मात्र चालक आणि वाहक यांची जबाबदारी स्पष्ट न पाळता काही ठिकाणी वाहकच बस चालवत असल्याचे चित्र दिसून येते. तालुक्यातील स्थानिक फेऱ्यांमध्ये बस दोन-दोन तास बसस्थानक किंवा बसवेश्वर, अजनी चौक परिसरात उभ्या राहत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळच्या गर्दीच्या वेळी बसमध्ये मोठी गर्दी असतानाही प्रवाशांशी अवमानकारक भाषा वापरली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वृद्ध प्रवाशांना अपमानास्पद शब्दांत बोलणे, महिलांशी अयोग्य भाषेत संवाद साधणे, दूध कॅन किंवा इतर मालाबाबत अरेरावी करणे, पासधारक प्रवाशांशी हुज्जत घालणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप आहे.

काही वेळा बस बंद करून प्रवाशांशी वाद घालण्याचेही प्रकार घडत असल्याचे सांगितले जाते. राणी अंकुलगा, सुगाव, देवगरा, आनंदवाडी या गाडीचे दूध आहे, तिकडे ठेवा अशा आदेशाच्या सुरात बोलणे, प्रवाशांना कमी लेखणारी भाषा वापरणे, स्वतः मालक असल्याप्रमाणे वागणे यामुळे सामान्य प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.एस.टी. महामंडळाच्या प्रतिमेला धक्का पोहोच-वणाऱ्या या प्रकाराकडे विभागीय नियंत्रक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांना सन्मानाने सेवा मिळेल याची खात्री करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT