Animal Husbandry Minister, Guardian Minister took information about Glanders
लातूर, पुढारी वृतसेवा: लातूर जिल्ह्यात्त घोड्यास झालेल्या ग्लैंडर्स रोगाबाबात राज्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून पशुसंवर्धन मंत्री पकंजा मुंडे व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या आजाराबाबत जिल्हाधिकारी तसेच लातुरच्या पशुसंवर्धन विभागाकडून विस्ताराने माहिती घेतली असून या आजारास प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना, युध्दपा तळीवर राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात एका घोडधास ग्लैंडर्सची लागण झाल्याची खात्री झाली असून त्या घोड्यास दयामरण देण्यात आले आहे. याशिवाय चार घोडे संशयीत आढळल्याने त्यांचे रक्तजल नमुने व नाकातील खाव निदानासाठी पुणे व हरियाणा येथील प्रयोगशाळेत आज पाठविण्यात येत असून, अहवाल आल्यानंतर पुढच्या अहवाल पॉजेटिव्ह आला तर संबधीत घोड्यांना दयामरण द्यावे लागेल असेही डॉ. शिंदे म्हणाले. दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील अश्वमालांचा हॉर्स ओनर्स नावाने व्हाटस अप ग्रुप बनविला असून त्यात अनेक पशुवैद्यकीय अधिकारीही आहेत.
कोणाच्या घोड्यास आजार असेल अथवा ग्लैंडर्सची लक्षणे असतील त्यांनी तातडीने त्याची माहिती ग्रुपवर शेअर करावी अथवा अधिकार्याशी तत्तकाळ संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. याशिवाय ग्रामिण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतील पशुवैद्यकांना आपापल्या कार्यक्षेत्रात या अजाराबाबत विशेष लक्ष पुरवण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर लक्ष देऊन असून दररोज आढावा घेतला जात आहे.
हा रोग अत्यंत संसर्गजन्य व माणसांमध्येही सहज पसरणारा असल्याने बाधीत व संशयीत या घोड्यांच्या पर्कात आलेल्या माणसांचीही अरोग्य तपासणी करण्याच्या सुचना प्रशासनाने आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तथापि या अश्वांच्या संपर्कात आलेल्यांची यादीच पशुसंवर्धन विभागाने आरोग्य विभागाला अद्यापी दिली नसल्याने ती आरोग्य तपासणी अजनुही झाली नाही, हे विशेष.
लातूर जिल्ह्यातील अश्वमालकांची तसेच घोड्यांची निगा राखणार्या हँडलर्सची यादी आम्ही पशुसंवर्धन विभागाकडून मागवली असून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांना ती देण्यात येणार आहे. त्यांच्या परिसरात घोड्याच्या संपर्कात येणार्या व आलेल्या व्यक्तींवर लक्ष पुरवण्यास सांगण्यात आले आहे. या दरम्यान काही लक्षणे आढळलीच तर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.डॉ. बालाजी शिंदे, गिलहा आरोग्य अधिकारी लातूर