Sambhajinagar Crime News
Latur Crime News : वृध्दांना लुटणाऱ्यांना चार तासांत अटकFile Photo

Latur Crime News : वृध्दांना लुटणाऱ्यांना चार तासांत अटक

गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Published on

Those who robbed the elderly were arrested within four hours

लातूर, पुढारी वृतसेवा : लामजना परिसरामध्ये रोडवर बयोवृद्धाला लुटणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासांत मुद्दमालासह किल्लारी पोलिसांनी अटक केली, वसीम रजाक शेख (बय २१ वर्ष, रा. शिंदगाव ता. रेणापूर) जिल्हा २) इम्रान महताब शेख (वय २४ वर्ष, रा. शिंदगाव) व कौरव जनक लहाडे (वय ४१ रा. पाखरसांगवी) अशी आरोपींची नावे आहेत.

Sambhajinagar Crime News
Dangerous glanders infection : लातूर जिल्ह्यात घोड्यास धोकादायक ग्लँडर्सची लागण, माणसांनाही संसर्ग होतो

याबाबत थोडक्यात माहिती १४ जून रोजी दुपारी १२:, ३० वाजता लामजना शिवारातील रोड वरून जाणाऱ्या एका ८४ वर्षीय वृद्धाला तू आमच्या अंगावर का थुकलासअसे म्हणून मारहाण करून त्याच्या जवळील १५ हजार रोख रकम व हातातील अंगठ्या उपरोक्त ोपींनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून घेतल्या होत्या.

त्यावरून किल्लारी पोलीस ठाण्यात येथे अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांनी तात्काळ अधिकारी अमलदारांचे पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली.

दरम्यान नमूद पोलीस तपास पथकाला रुपये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर-आरोपीला ताब्यात घेतले आरोपींना गुन्हा कबूल केला. आरोपींकडून सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कन तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शनात किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिंदे, ढोणे, पोलीस अंमलदार गणेश यादव, दत्ता जाधव, बालाजी लटुरे, सोमवंशी, रवी करके, आबा इंगळे यांनी ही कारवाई केली केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news