Crime News pudhari photo
लातूर

Latur Crime : जुगार अड्ड्यावर धाड; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

लातूर : अहमदपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत रोख रकमेसह आठ मोबाईल आणि चार दुचाकी असा एकूण ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात पाठवले होते. या पथकाने अहमदपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत, भगवान बोकारे यांच्या वाड्यातील बंद खोलीतसुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या कारवाईत १७ हजार १०० रुपयांची रोकड, आठ मोबाईल आणि चार दुचाकी असा एकूण ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT