Latur Fodder Shortage Prevention : लातूर जिल्ह्यातील चारा बाहेर नेण्यास बंदी; कारखान्यांनाही वापरता येणार नाही

औद्योगिक वापरावरही निर्बंध; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचे आदेश
Latur Fodder Shortage Prevention
Latur Fodder Shortage Preventionpudhari photo
Published on: 
Updated on: 

लातूर : जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने चारा, वैरण आणि पिकांचे अवशेष जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतूक करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. तसेच बायोकोल प्रकल्प, बायोमास ऊर्जा प्रकल्प, वीटभट्ट्या आणि साखर कारखान्यांमध्ये इंधन म्हणून पिकांचे अवशेष वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

खरीप हंगामातील पावसाची तूट आणि पिकांच्या नुकसानीमुळे यंदा चारा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे कुटार, ज्वारी व मक्याचा कडबा, गव्हाचे काड, हरभरा व तुरीचे भुसकट तसेच उसाचे पाचट आणि चोथा पशुधनासाठी उपयुक्त आहेत. मात्र, या अवशेषांचा औद्योगिक इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने स्थानिक पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Latur Fodder Shortage Prevention
Dawargaon Devi Jagdamba Mata Temple : डावरगाव येथील नवसाला पावणारी जगदंबा माता

आदेशानुसार, लातूर जिल्ह्याच्या महसुली सीमा ओलांडून कोणत्याही वाहनातून चारा किंवा पिकांचे अवशेष इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर नेण्यास मनाई आहे. औद्योगिक प्रकल्पांनाही इंधनासाठी चारा व भुशाची खरेदी किंवा साठवणूक करता येणार नाही.मात्र, जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्थानिक पशुधनाच्या वापरासाठी चारा वाहून नेण्यास मुभा असेल. तो जिल्ह्याबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Latur Fodder Shortage Prevention
Powai Lake Water: पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणार!महापालिका तांत्रिक बाबी तपासणार

...तर कारवाई होणार

आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलिस, कृषी, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना वाहनांची तपासणी, बेकायदेशीर वाहतूक रोखणे आणि चारा जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, व्यापारी, वाहनचालक आणि औद्योगिक आस्थापनांवर संबंधित कायद्यांनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news