Matsyodari Devi Temple Ambad : मत्स्योदरी देवीच्या सातव्या माळेला होणार अलोट गर्दी

१२ अधिकारी, २०५ पोलिसांचा बंदोबस्त
Matsyodari Devi Temple Ambad
यात्रेच्या बंदोबस्तासाठी १२ पोलिस अधिकारी आणि २०५ पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.pudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड : अंबड येथील आदिशक्ती श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील शनिवार(१७) हा सातव्या माळेनिमित्त यात्रेचा मुख्य दिवस आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने मंदिर परिसरात भक्तांची गर्दी वाढत आहे.

यात्रेदरम्यान भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे आणि यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी संस्थान प्रशासनासह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी १२ पोलिस अधिकारी आणि २०५ पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

Matsyodari Devi Temple Ambad
Powai Lake Water: पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणार!महापालिका तांत्रिक बाबी तपासणार

मराठवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मत्स्योदरी देवीला अंबड व घनसावंगी तालुक्याचे ग्रामदैवत मानले जाते. शारदीय नवरात्र महोत्सवाची मोठी परंपरा असून सातव्या माळेला तसेच कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यामुळे यात्रेदरम्यान मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थान प्रशासनाने दर्शन व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन केले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर जालना-बीड मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जालना-बीड मार्गावरील वाहतूक पाचोडमार्गे बीडकडे वळविण्यात आली आहे. तसेच वडीगोद्री येथील उड्डाणपुलापासून येणारी वाहतूक पाचोडमार्गे अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जालन्याकडे वळविण्यात आली आहे.

Matsyodari Devi Temple Ambad
Bus Staff Accommodation Problems : काहींना आरामांची सुविधा, काहींचा बसमध्येच मुक्काम

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीतील हे बदल लागू राहणार आहेत. यात्रेच्या बंदोबस्तासाठी १०० गृहरक्षक दलाचे जवान आणि जालना येथून राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे.

याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. बंदोबस्ताचे नियोजन आणि विविध पथकांमध्ये समन्वय राखण्यासाठी १२ पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच मेटल डिटेक्टर, वॉकी-टॉकी आणि जीपीएस ट्रॅकर यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष घोडके हे बंदोबस्तावर देखरेख ठेवत आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news