Dhiraj Deshmukh : जिल्हा बँकांच्या भरतीत भूमिपुत्रांसाठी ७० टक्के आरक्षण  File Photo
लातूर

Dhiraj Deshmukh : जिल्हा बँकांच्या भरतीत भूमिपुत्रांसाठी ७० टक्के आरक्षण

माजी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

70 percent reservation for locals in district bank recruitment

लातूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत आता स्थानिक भूमिपुत्रांना मोठी संधी मिळणार आहे. सहकार विभागाने शुक्रवारी (दि. ३१) घेतलेल्या निर्णयानुसार, संबंधित जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी तब्बल ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय आधीपासून सुरु असलेल्या भरती प्रक्रियेलाही लागू होणार आहे.

या निर्णयासाठीलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार धिरज देशमुख यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

राज्य शासनाने जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियेला पारदर्शक व वादमुक्त ठेवण्यासाठी ऑनलाईन पद्धती अनिवार्य केली आहे. काही बँकांनी ऑनलाईन भरतीप्रक्रिया सुरू केल्यावर स्थानिक उमेदवारांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. जिल्हा बँकांचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने स्थानिक रहिवाशांनाच प्राधान्य मिळावे, अशी मागणी धिरज देशमुख यांनी केली होती.

त्यांच्या प्रयत्नांनंतर सहकार आयुक्तांनी स्थानिकांसाठी ७० टक्के व जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी ३० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. शासनाने हा प्रस्ताव मंजूर करत ७०-३० फार्मुला लागू केला आहे. या निर्णयामुळेराज्यातील सर्व जिल्ह्यांतील स्थानिक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जर ३० टक्के जिल्हाबाहेरील जागांसाठी पुरेसे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांकडून भरता येतील, अशी तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे.

जिल्हा बँकांचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असून बँकांमध्ये स्थानिक शेतकरी, संस्था व ठेवीदारांचा सहभाग आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य मिळावे, ही मागणी मी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. शासनाने ती मान्य केली. याबद्दल राज्यातील तमाम स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आभार मानतो.
- धिरज देशमुख, मा. आमदार तथा अध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT