मराठवाडा

लातूर: मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला: ४ ठार, २ जण जखमी

अविनाश सुतार

निलंगा- चाकूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर – जाहिराबाद महामार्गावर निलंगानजीक कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जण ठार झाले. तर २ गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि. २४) सकाळी १२ च्या सुमारास घडली. अपघातातील सर्वजण मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी चाकूर येथून बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे जात होते.

भगवान मोतीराम सावळे (वय ५२), लता भगवान सावळे (वय ४५), विजयमाला भाऊराव सावळे (वय ५४) व राजकुमार सुधाकर सावळे (वय २९) अशी अपघात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघात महेश भगवान सावळे (वय १९) व शुभम सुनील सावळे (वय ६) हे जखमी झाले असून त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी चाकूर येथून (एमएच २४ ए. एफ १८४५) या कारने हे कुटुंब बसवकल्यानकडे निघाले होते. अनसरवाडा पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने पलट्या खालल्या. यात कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक गर्जे आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले. जखमींना उपचारार्थ निलंगा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT