वाळकी : दहा लाखांच्या मुद्देमालासह लातूरमधून दोघे जेरबंद | पुढारी

वाळकी : दहा लाखांच्या मुद्देमालासह लातूरमधून दोघे जेरबंद

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने लातूर येथे जाऊन शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चोरेलेला वीजपंप व एक टेम्पो असा 10 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गैयबीसाहब युनुस शेख (वय 21, रा. हरंगूळ, लातूर), भाऊसाहेब बापू आडे (रा. तळणी तांडा, ता. औसा. जि. लातूर) असे पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपीना न्यायालयानेे पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दि 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नगर-कल्याण रोडवरील जखणगाव शिवारात कुंदन हॉटेलच्या आवारातून विहिरीवरची सबमर्सिबल वीजपंप चोरीस गेला. याबाबत गौरव राम त्र्यंबके (नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.
या गुन्हयाचा तपास करतना सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना आरोपी लातूर येथे असल्याचे समजले. पोलिस पथकाने तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना पकडले. दोघांना चोरलेला वीजपंप व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो हस्तगत करून त्यांना अटक केली.

Back to top button