Jalna News : गावठी पिस्तूल व सहा काडतुसांसह युवक जेरबंद File Photo
जालना

Jalna News : गावठी पिस्तूल व सहा काडतुसांसह युवक जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शस्त्रविरोधी मोहिमेला बळ मिळाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Youth arrest with pistol and six cartridges

जालना, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी ते राजेगाव रस्त्यावर एका युवकास गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसासह जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शस्त्रविरोधी मोहिमेला बळ मिळाले आहे.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध शस्त्र शोध मोहिमेसाठी विशेष पथक तयार केले होते. पथकाला महेश विष्णू निचळ (२६) (रा. शिंदे वडगाव, ता. घनसावंगी) हा पानेवाडी ते राजेगाव रस्त्याने कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात कलम ३/२५ आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच अंमलदार प्रभाकर वाघ, देविदास भोजने, इर्शाद पटेल, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, दत्ता वाघुंडे, सोपान क्षीरसागर, धीरज भोसले, योगेश सहाने आणि चालक अशोक जाधवर यानीं केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

अवैध शस्त्रांचा मुद्दा चर्चेत

जालना शहरात मंगळवारी एका युवकाच्या ताब्यातून गावठी पिस्तुल जप्त करण्यात आल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने जालना शहरासह जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT