Who will put a stop to the deplorable condition of the roads?
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : आन्वा ते भोकरदन या मुख्य रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनधारक ये-जा करतात. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गाचे डागडुजी अथवा डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे त्रास अधिकच वाढला आहे.
भोकरदन ते आन्वा या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याखाली खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
वाकडी येथील नागरिक व विद्यार्थी दररोज या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहेत.
या भागातील नागरिक दररोज या मार्गान भोकरदन तालुक्याला प्रवास करतात. मात्र, रस्त्याची झालेली चाळण त्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरते आहे. रोज शाळेच्या वेळेस मुलांना सोडताना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते. या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत काही छोटे-मोठे अपघात झाले असून, गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रस्त्यावर दुचाकी वाहनचालक, विशेषतः महिलावर्ग आणि वृद्ध नागरिक यांना प्रवास करताना अधिक त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची डागडुजी त्वरित करावी, अशी मागणी स्थानिकांतून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसह वाहनचालकांचा संताप
वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्यात पावसाचे पाणी साचल्याने या खड्डांचा पावसाळ्याचे या रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्डा अधिकाधिकच मोठा होत होता. यावर पाणी आल्याने नवीन वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे वेळेच लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनीही या रस्त्याबाबत संताप व्यक्त केला आहे.