Two vehicles transporting illegal sand seized
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा जाफ्राबाद तालुक्यातील बोरखेडी चिंच येथे अवैध वाळू वाहतूक करणारे विना नंबर एक टिप्पर व एक हायवा असे दोन वाहने शनिवार दि. ६ रोजी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेली अवैध वाळू घरकुल लाभार्थीना शासकीय नियमांनुसार वाटप करण्यात आली आहे.
दरम्यान, जाफराबाद तालुक्यात सर्रासपणे अवैध वाळू वाहतुक होत होती. या अवैध गौण खनिज, वाळू उत्खनन व वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागामार्फत संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान, तहसीदार डॉ. सारिका भगत यांच्यासह ग्राममहसूल अधिकारी निवृत्ती वाघ, रवींद्र वैद्य, अंकुश सोन-वणे, महसूल सेवक राजेश खांडेभराड, भगवान इंगळे आदींच्या पथकाने अवैध वाळू वाहतुक करणारी दोन वाहने जप्त केली आहे. तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या सूचना तहसिलदार डॉ. सारिका भगत यांनी दिल्या.