जालना : कृषी मंगळवार, दि. ३ रोजी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाली. बाजारात विविध शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली असून, बाजारात तुरीला १० हजार ४५१ रुपये प्रति क्विंटल इतका कमाल भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.
तसेच, सोयाबीनची ६ हजार ३३० क्विंटलची विक्रमी आवक नोंदवली गेली असून, त्याला कमाल ७ हजार ४०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे.
या उत्पन्न बाजार समिती येथे आज आजच्या बाजारभावात रेशीम कोषाने बाजी मारत तब्बल ६५ हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर गाठला आहे. जवळपास ५ कोटी ८८ लाख रुपयांवर क्विंटल शेतमालाची आवक झाली आहे.