Jalna News : मनपा निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती ! File Photo
जालना

Jalna News : मनपा निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती !

शिवसेना-भाजप लढत, आघाडीला बसणार बंडखोरीचा फटका

पुढारी वृत्तसेवा

The Shiv Sena-BJP contest will be affected by rebellion within the alliance

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असतानाच महायुती व आघाडीतील "दोस्तीमध्ये कुस्ती" रंगताना दिसत आहे. वरवर एकीचे चित्र असले तरी आतल्या गोटात जागा वाटपावरून मतभेद, नाराजी आणि अस्वस्थता उफाळून येत आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व राजकीय वातावरण तापले असून अनेक प्रभागांत आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती तुटली. स्वबळाचा नारा देण्यात आला. असे असले तरी काही प्रभागात एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे. तसेच विरोधी बाजूने ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. आघाड्यांमध्ये मनपा निवडणूक लढवली जात असली तरी जागा वाटप हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा ठरत आहे.

पक्षातील बड्या नेत्यांना दोन दोन तिकिटे दिल्याने यावर देखील अंतर्गत खदखद बाहेर येणार आहे. आघाडीतील घटक पक्ष प्रभाग क्रमांक ५ अ आणि प्रभाग क्रमांक १५ व मध्ये काँग्रेस उभाठा शिव सेना, प्रभाग क्रमांक ८ क, प्रभाग क्रमांक १० ब, १० ड आणि प्रभाग क्रमांक १३ व मध्ये काँग्रेस शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर उभे आहेत.

काही ठिकाणी बंडखोरीचे संकेतही मिळत असून अपक्ष उमेदवारी किंवा मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आघाडीतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात जागा वाटपावरून अजून एकमत झाले नाही. काही प्रभागात गोंधळ निर्माण झाला आहे.

जालना मनपा निवडणूक ही केवळ पक्षीय नव्हे तर स्थानिक वर्चस्वाची लढाई बनली आहे. अनेक ठिकाणी वैयक्तिक राजकारण, गटबाजी आणि जुने हिशेब चुकते करण्याची मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे आघाड्यांमधील अंतर्गत संघर्षाचा थेट फायदा विरोधकांना किंवा अपक्षांना होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वरिष्ठ नेत्यांकडून "एकीचा संदेश" दिला जात असला तरी स्थानिक पातळीवर नाराजी शमवणे हे मोठे आव्हान ठरत आहे. येत्या काही दिवसांत जागा वाटपाचा तिढा सुटतो की दोस्तीतली कुस्ती अधिकच तीव्र होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मनपा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी जालना शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

२ लाख ४५ हजार मतदार

जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी २ लाख ४५ हजार ९२९ मतदारांची नोंद आहे. त्यात १ लाख २८ हजार ८९३ पुरुष तर १ लाख १७हजार २ महिला मतदार आहेत. शिवाय ३४ इतर मतदारांची नोंद आहे. जालना महापालिकेच्या ६५ सदस्यांना हे मतदार निवडूण देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT