Jalna The process of intra-district transfer of teachers has begun
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या चालू असलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेने गती घेतली आहे. जिल्हांतर्गत बदली मध्ये विशेष संवर्ग एक मधील बदली इच्छुक शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने बदली पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदली पोर्टलवर रिक्त पदे बदली पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहेत बदली प्रक्रियेतील टप्प्याप्रमाणे विशेष संवर्ग एक मध्ये कर्करोग, हृदयविकार शत्रकीया, विधवा, परितक्त्या, कुमारी शिक्षिका आणि दिव्यांग शिक्षक अशा विशेष बाबीमुळे प्राधान्य असलेल्या शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार पसंती क्रम देऊन तीस शाळा निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रक्रियेसाठी १२ ते १५ जुलै अशी मुदत देण्यात आली आहे. हि बदली प्रक्रिया व्हिनस कंपनी कडून ग्राम विकास विभागाव्दारे राबवली जात आहे. या बदली प्रक्रियेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास साडेतीन हजारांच्यावर असलेल्या शिक्षकांना मिळणार आहे. गेल्या अनेक महीन्यापासुन आंतर जिल्हा बदली प्रक्रिया रखडली असल्याने बदली इच्छुक शिक्षकांचे लक्ष याकडे लागले होते.
मागील दोन वर्षापासून शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवली न गेल्याने यावर्षी बदली पात्र शिक्षकांची संख्या वाढली होती. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया तातडीने राबवण्यासाठी शिक्षकांच्या विविध शिक्षक संघटनांनी ग्रामविकास विभागकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाल्यामुळे बदली इच्छूक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे विशेष संवर्ग एक प्राधान्य क्रममधील शिक्षकांना बदली अर्ज भरण्याची संधी दिल्यानंतर विशेष संवर्ग दोन, अवघड क्षेत्रातील बदली पात्रता धारक शिक्षक . सर्वसाधरण बदली पात्र शिक्षक अशा पद्धतीने इतर शिक्षकांना देखील बदली प्रक्रियेसाठी संधी मिळणार आहे.
जिल्हांतर्गत बदली मध्ये विशेष संवर्ग एक मध्ये बदली इच्छुक शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने पसंती क्रम देण्याची प्रक्रिया बदली पोर्टलवर सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाकडून पुढील बदली प्रक्रिया टप्पे तातडीने पार पाडावेत.- संतोष राजगुरु, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना