Jalna News : मुलीस पळवून नेणारा जेरबंद, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी  File Photo
जालना

Jalna News : मुलीस पळवून नेणारा जेरबंद, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी

तीर्थपुरी येथील अल्पवयीन मुलीस २२ एप्रिल २०२४ मध्ये पळवून नेण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

The girl's kidnapper was arrested, the performance of the Immoral Human Trafficking Prevention Cell

जालना, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथून एका अल्पवयीन मुलीस उत्तर प्रदेशातील रतनपूर विजयनगर येथे पळवून नेणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने जेरबंद केले.

तीर्थपुरी येथील अल्पवयीन मुलीस २२ एप्रिल २०२४ मध्ये पळवून नेण्यात आले होते. आरोपी व पीडित हे पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने लव्हाळे गाव (ता. मुळशी जि. पुणे) येथून आर-ोपीस ताब्यात घेतले. यावेळी पीडित व आरोपीस तपासासाठी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे, पोउपनि रवींद्र जोशी, पोउपनि संजय गवळी, जमादार कृष्णा देठे, सागर बावीस्कर (स्थागुशा), महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT