

Sweetmart broken into, cash worth Rs. 40,000 looted
परतूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील बिकानेर स्वीटमार्ट या मिठाई हे दुकान फोडून चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोकसिंह या प्रकरणी जगदिसिंह राजपुरोहित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, त्यांच्या दुकानाचे तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख ४० हजार रुपये चोरून नेले. चोरी करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास जमादार रामदास फुपाटे हे करीत आहे. पोलिसांकडून घटनेस्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. परतूर शहरातील भररस्त्यावरील दुकान फोडण्यात आल्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.