

Gold once again rebounded strongly, reaching a high of Rs 1 lakh 20 thousand.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे आकर्षण आणि महत्त्व आधुनिक काळातही कमी झालेले नसून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने आता सोने घेणे सामान्यांच्या आवाक्यात बाहेर गेले आहे. तरीदेखील खरेदीचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे सराफ बाजारात दिसून येत आहे. सोन्याने परत एकदा चांगलीच उसळी घेत १ लाख २० हजार रुपयांचा उच्चांक गाठला.
सामान्यांना परवडत नाही. अशी कितीही ओरड असली तरी मागणी कमी होत नाही. यावरून सोन्याचे महत्त्व आजही कायम असल्याचे बाजारातील स्थितीवरून दिसते. प्राचीन काळापासून सोन्याच्या आभूषणाला असलेले महत्त्व आजही कायम असून त्याला आधुनिक टच मिळाला आहे.
अलंकार परिधान करून तुमची श्रीमंती तर दिसते. पण व्यक्ती महत्त्व सुद्धा खुलून दिसते. म्हणून विविध सण-उत्सव आणि लग्न सोहळ्यात दागिने घातले जातात. सोन्याची आवड आणि श्रीमंतीच्या थाटाचे प्रदर्शनही यातून दाखविण्यात येते. सोने महाग होत असले तरी एक भविष्यकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून तसेच नागरिकांच्या अडचणीच्या वेळी आर्थिक गरज भागविण्यास मदत मिळत असते.
घरातील शुभकार्य, लग्नप्रसंगी मुलगी, सून यांना सोने देण्याची परंपरा आहे. आरोग्यदृष्टीने अंगावरील दागिने औषधाचे काम आ करीत असतात, अशी समज असली तरी आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक आणि दंत चिकित्सामध्ये यांचा उपयोग केला जातो. भारतातच नव्हे तर जगात याला मागणी आहे.