The decision regarding the mayor's name has been left to the senior leaders
जालना, पुढारी वृत्तसेवा
जालना शहर महापालीकेच्या पहिल्या महापौर पदाचे नांव भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडुन निश्चीत होणार असल्याची माहिती माजी आ. कैलाश गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यामुळे स्थानिक नेत्यांनी महापौरांच्या नावांचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलविला असल्याचे दिसून येत आहे.
जालना महापालीका निवडणुकीत ६५ जागांपैकी भाजपाने ४१ जागांवर विजय मिळवुन बहुमत मिळवले. यामुळे पहिला महापौर भाजपाचाच होणार हे निश्चीत झाले होते. महापौर पदाच्या आर-क्षणात जालना महापालीकेचे महापौरपद अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत झाले असुन भाजपातर्फे या पदासाठी रुपाताई कुरील, श्रध्दताई साळवे, वंदनाताई मगरे व अॅड रिमाताई खरात या चार नगरसेवीकांचे नांवे वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहेत.
वरिष्ठ नेते यातील एक नांव फायनल करुन ते ३० जानेवारी पर्यंत कळविणार असल्याचे माजी आ. कैलाश गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले. गटनेत्याची निवड शनिवारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या महापौरपदाचा उमेदवार ३० जानेवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा महापौर पदानंतर उपमहापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महापौरपदानंतर उपमहापौरपद आपल्याच जवळच्या व्यक्तीला मिळावे यासाठी दिग्गजांमधे रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
महापालीकेत सर्व पक्षाना सोबत घेउन चालणार असल्याची ग्वाही माजी आ. गोरंट्याल यांनी दिली. पिण्याचे पाणी, कचरा व मोकाट जनावरे हे आमच्या पुढील महत्वाचे प्रश्न असल्याचे त्यांनी सांगीतले. भाजपाचे माजी आ. कैलाश गोरंट्याल व भाजपा शहर महापालीका अध्यक्ष भास्कर दानवे यांनी भाजपाच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनीही नवनिर्वाचीत नगरसेवकांची बैठक घेउन त्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले आहे. अनेक नगरसेवकांनी वार्डातील समस्यांवर कामही सुरु केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जालना महापालिकेच्या पहिला महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जालनेकरांचे लक्ष लागून आहे. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चारही उमदेवारांची नांवे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून दिल्याने वरिष्ठ नेते ठरवतील त्याच उमेदवाराच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार असल्याचे दिसत आहे.