Jalna Crime | जालना : तरुणाचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेले हल्लेखोर जेरबंद

कदिम जालना पोलिसांनी अंबड रोडवर सापळा रचून घेतले ताब्यात
Crime News
Crime NewsPudhari file photo
Published on
Updated on

Kadim Jalna Police Station

जालना : जालना शहरात गोळीबार करून तरुणाची निर्घृण खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना कदिम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल (वय २७) हा तरुण आपल्या दुचाकीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना, स्कुटीवरून आलेल्या अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड या दोघांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्याने चरण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Crime News
Jalna Crime News : मुलीचे अपहरण करून बळजबरीने लावले लग्न

या घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. गोळीबारासारख्या गंभीर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, आरोपी जालन्यातील अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती कदिम जालना पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार कदिम जालना पोलिसांच्या पथकाने तातडीने हालचाली करत काजळा फाटा परिसरात सापळा रचला. यावेळी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असून, हत्येमागील कारण, वापरलेले शस्त्र आणि इतर सहकारी यांचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी पुढील तपास कदिम जालना पोलीस करत असून, आरोपींविरोधात खून व बेकायदेशीर शस्त्र वापराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news