Agriculture News ; उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरचीचे पाने कोमेजली file photo
जालना

Agriculture News; उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरचीचे पाने कोमेजली

पिंपळगाव रेणुकाई : कडक उन्हामुळे मिरचीचे पीक धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

The chili leaves withered due to the intensity of the heat

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई व परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कडक उन्हामुळे नव्याने लागवड केलेल्या मिरचीच्या कवळ्या रोपांची पाने कोमेजून जाऊ लागली आहेत.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरच्या साहाय्याने केलेल्या लागवडीतून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मिरचीची रोपे सुकू लागली आहेत. सकाळी ११ नंतर शेतात काम करणेही अशक्य झाले असून, उष्णतेचा फटका थेट पिकाला बसत आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, पाणी पुरेसे नाही जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे दररोज ठिबकद्वारे पाणी द्यावे लागत आहे, तरीही रोपांची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी रोपे पूर्णपणे करपण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पिकावर सततच्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लागवडीपासून ते आजपर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.

खर्च वाया जाण्याची शक्यता दोन एकर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली आहे. यात जवळपास आतापर्यंत ५० ते ६० हजार रुपये एकरी खर्च झाला आहे. परंतु उन्हाचा पारा ४१ डिग्री सेल्सियस असल्याने शेतात लागवड शेतात सुकू लागले आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढले आहे.
- संजय तायडे, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT