जालना

मनोज जरांगेंची तहसीलदारांनी घेतली भेट; उपोषण सोडण्याची केली विनंती

निलेश पोतदार

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा अंबडच्या तहसीलदार धनश्री भालचिम यांनी आज (शनिवार) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदारांनी जरांगे यांना सगे सोयरे कायद्याबाबत कारवाई सुरू असल्‍याचे सांगत आपण उपोषण सोडावं अशी विनंती केली. यावर मनोज जरांगे यांनी तहसीलदारांना "आधी सगे सोयरे कायदा करा नंतर उपोषण सोडतो" असं वाक्य लेखी लिहून दिल. मात्र यावर तहसीलदार काहीच उत्तर न देता निघून गेल्या.

अंतरवालीतील काही ग्रामस्थांनी आंदोलनाला विरोध केला असल्याने या ठिकाणी काही वाद होऊ नये म्हणून तहसीलदारांनी  आंदोलनाच्या पहिल्या दिवशी धाव घेत जरांगे पाटलांना उपोषण सोडावे अशी विनंती केली. सरकार सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया राबवत आहे असे सांगितले, मात्र त्यावर मनोज जरांगे यांचे समाधान झाले नाही ते उपोषणावर ठाम आहेत. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा. तरच उपोषण सोडतो असे त्यांनी तहसीलदार यांना सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT