Rabi Season : रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढणार, गव्हाला अधिक पसंती  File Photo
जालना

Rabi Season : रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढणार, गव्हाला अधिक पसंती

आन्वा परिसरात रब्बी पेरणीस वेग, जमिनीत ओलावा टिकून

पुढारी वृत्तसेवा

Sowing area will increase in the Rabi season, wheat will be more preferred

आन्वा, पुढारी वृत्तसेवा रब्बी हंगामातील पेरणीला सध्या वेग आला आहे. पण काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे उशीरही झाला आहे. खरीप पिकांची काढणी पूर्ण झाल्यावर आणि जमिनीतील ओलावा टिकून राहिल्यावर रब्बी पेरणीला गती येते, मात्र सध्या काही भागांमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे पेरणी रखडली आहे. यावर्षी पावसाने भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीमळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले, परंतु जलसाठे सध्या भरलेले आहेत. त्यामळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.

प्रकल्प आणि तलावांमध्ये मुबलक पाणीसाठ्यामुळे सिंचनाची पुरेशी उपलब्धता निर्माण झाली असून या अनुकूल परिस्थितीमुळे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या हंगामात गव्हाचे क्षेत्र विक्रमी वाढ होणार असून शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा गव्हाकडे वळला आहे.

गेल्या काही वर्षापासून हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. सिंचनाच्या वाढलेल्या सोयीमुळे आणि स्थिर बाजारभावामुळे गव्हाचे उत्पादन वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शिफारसही विविध जातीचे बियाणे वापरावे, नत्र, स्फुरद आणि पालाशाचे संतुलित प्रमाण ठेवावे.

ओलावा वाढला

यावर्षी खरीप पिकांची काढणी उशिरा झाल्याने तसेच जमिनीत योग्य वाफसा नसल्याने रब्बी लागवडीचा वेग मंदावला होता. शिवाय, सुरुवातीच्या काळात हवामान पोषक नसल्याने शेतकरी पेरणीसाठी पुढे आले नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सुधारणा आणि जमिनीतील ओलावा वाढल्याने शेतकरी आता पीक लागवडीसाठी वळू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT