Solar Energy Revolution | सौरऊर्जा क्रांतीच्या नव्या दिशा Pudhari File Photo
जालना

Solar Energy : जिह्यातील ४५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा आधार

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : ८,१४७ पंपांसह जालना तालुका अव्वल

पुढारी वृत्तसेवा

Solar Energy Support for Over 45,000 Farmers in the District

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय झाली आहे. यामुळे त्यांचे रात्रीचे जागरण थांबवणार आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' अंतर्गत जालना जिल्ह्यात महावितरणने जालना सर्कल अंतर्गत आतापर्यंत तब्बल ४५ हजार ७९८ कृषी पंपांची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. या मोहिमेत ११ हजार ६०७ शेतकऱ्यांच्या पैसे भरण्यासह आणि ८ हजार १४७पंपांच्या उभारणीसह 'जालना ग्रामीण' विभागाने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

घनसावंगीत सर्वाधिक पैसे जमा, बदनापूर-मंठा मागेमहावितरणकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जालना सर्कलमध्ये एकूण ६९ हजार २२८ शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी कोटेशनचे पैसे भरले आहेत. यामध्ये घनसावंगी तालुक्यातून सर्वाधिक १२ हजार ३२६ शेतकऱ्यांनी रक्कम जमा केली आहे, तर त्याखालोखाल जालना ग्रामीणमधून ११ हजार ६०७आणि भोकरदनमधून ११ हजार ४७६ अर्जदारांनी पैसे भरले आहेत.

सर्वात कमी प्रतिसाद मंठा (४,०८०) आणि बदनापूर (४,७६८) उपविभागात पाहायला मिळाला आहे. कागदपत्रांची छाननी आणि प्रत्यक्ष कामजिल्ह्यात ६९ हजार २२८ पैकी ६६ हजार ९३९ अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. ५५ हजार २११ शेतकऱ्यांसाठी पुरवठादार निश्चित करण्यात आले असून, ५४ हजार ४८१ ठिकाणी लाईनमनद्वारे प्रत्यक्ष जागेची पाहणी पूर्ण झाली आहे.

उपविभागनिहाय झालेली पंप उभारणी शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज मिळवून देण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, उर्वरित २३ हज- ारहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच सौर पंप मिळतील, असा विश्वास महावितरणच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

तालुकानिहाय पंप

जालना ग्रामीण: ८, १४७

भोकरदन : ७,७२६

घनसावंगी : ७,५०८

जाफ्राबाद : ६, १७६

अंबड : ५,३९५

परतूर : ४,९७९

बदनापूर : ३,५४१

मंठा : २,३२६

जालना शहर (अर्बन): ००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT