Monsoon Update  (File Photo)
जालना

Monsoon Sign : पावसाचे संकेत, कावळ्याचे घरटे दुर्मीळ

ग्रामीण भागातील लोक पावसाचे अंदाज हे सामान्यतः पारंपरिक ज्ञानावर

पुढारी वृत्तसेवा

Signs of rain; crow's nests are a rare sight.

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या काळात हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा नव्हती. त्यावेळेस पक्ष्यांचे आवाज आणि पावसाळ्यापूर्वी झाडावर बांधत जाणारी कावळ्यांची घरटी कशी बांधली आहेत. यावरून शेतकरी पावसाचे अंदाज लावत असत आणि ते खरे ठरत. पण आता मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मीळ झाले आहेत.

पावसाळा होण्याच्या सुरु एक महिन्यापूर्वी कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात नर, मादी झाडावर गोलाकार घरटी बांधायला सुरुवात करतात. ग्रामीण भागात कावळे घरटी बांधताना काडी तोंडात कशी धरतात. यावरूनही पावसाचे अंदाज व्यक्त केले जात असत. जर कावळ्याने काडी चोचीत मधोमध धरली तर मधल्या कावळ्याच्या घरट्यांवरून अंदाज, पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत.

नक्षत्रात भरपूर पाऊस वरुण ठेवेल, असे संकेत बांधले जायचे. जर कावळ्याने चोचीत काडी टोकावर धरली तर या वर्षात सुरुवातीला पाऊस नाही, शेवटच्या नक्षत्रात बरसणार असा अंदाज व्यक्त केला जात असे.

घरटे मधोमध असेल तर समाधानकारक पाऊस

कावळ्याचे घरटे बोर, जांभूळ, बाभूळ, सावळ यासारख्या काटेरी झाडावर आढळल्यास कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते. तर आंबा, निंब, अर्जुन, करंज, चिंच यासारख्या झाडावर घरटी बांधल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. शेतकरी सांगतात, कावळ्याने झाडाच्या मधोमध फांद्यांच्या बोचक्यात घरटे बांधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT