भोकरदनमध्ये घुमला तुतारीचा निनाद; नगरपालिकेत राकाँ. चे वर्चस्व File Photo
जालना

भोकरदनमध्ये घुमला तुतारीचा निनाद; नगरपालिकेत राकाँ. चे वर्चस्व

नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (शरद पवार गटाच्या) समरीन मिर्झा विजयी, माजी आमदार दानवेंची खेळी सार्थ

पुढारी वृत्तसेवा

Sharad Pawar's faction emerges victorious in Bhokardan; NCP establishes dominance in the municipality.

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा भोकरदन नगरपालिकेत तुतारीचा निनाद घुमला आहे. राष्ट्रबादी कॉग्रेस शरद पवार गटाच्या समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांनी भाजपाच्या आशा माळी यांचा ७४३ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार प्रांजल देशमुख यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल आहे.

पालिकेतील विजयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे बांची नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या उमेदवाराची खेळी यशस्वी ठरली. त्यांनी नगरपालिकेची सूत्रे काँग्रेसकडून ताब्यात घेत पालिकेत पुन्हा कमबॅक केले आहे. नगराध्यक्ष सह ९ नगर सेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे जिल्डाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा मोठा पराभव झाला असून, त्यांच केवळ दोनच नगर-सेवक निवडून आले आहे.

आमदार संतोष दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत भाजपा उमेदवार आशा माळी यांच्या मागे सर्व शक्ती पणाला लावली होती मात्र शहरातील सामाजिक समीकरणामुळे त्यांना पराभव बधावा लागला.

पावेळी आठ नगरसेवक भाजपाचे व एक नगरसेवक शिव-सेना शिंदे गटाचा असे नऊ नगर-सेवक निवडून आणण्यामध्ये त्यांना यश आले आहे त्यामुळे त्यांची शहरात पकड वाढली आहे.

धनशक्तीवर जनशक्तीचा विजय

नगरपालिकेतील विजयावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणाले की भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर केला मात्र त्यांच्या धनशक्तीवर आमच्या जनशक्तीने बिजय मिळविला आहे.

चंद्रकांत दानवे, माजी आमदार राष्ट्रवादी, शरद पवार गट सामाजिक समीकरणामुळे पराभव राज्यातील काही गावांचे सामाजिक समीकरण वेगळे असल्यामुळे या ठिकाणी भाजपाला प्रयत्नाची पराकाष्टा केल्यानंतरही विजय मिळत नाही. अशा गावापैकी भोकरदन विधानसभा मतदारसंघातील भोकरदन शहर व जाफराबाद शहर आहे. भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीत या सामाजिक समीकरणामु‌ळेच आमचा पराभव झाला, मात्र गेल्या वेळी पेक्षा या निवडणुकीत आमच्या नगरसेवकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त ने वाइली आहे.
-रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री

प्रभागनिहाय निकाल :

प्रभाग क्र. १/ जागा अ: (रेखाचाई द्वारकधीश बिरसोने भाजप) व शर्मा भूषण बाबूप्रसाद शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्र. २: अ पठाण अस्मतवेग वशीरखा (राष्ट्रवादी श.प.)

जागा २/ब: शहा अजहर अली युनुस अली (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

प्रभाग क्र. ३ : जागा अम देशमुख सुरेखाबई बाळू (राष्ट्रवादी श १) ३/ब पठाण अमेर शफीक (राष्ट्रवादी काँग्रेस श. प.)

प्रभाग ४: अ. पठाण बिसमिल्लाहयी सलीम खा (काँग्रेस) ४ व पठाण शफीकरखा माहेताब खा (राष्ट्रवादी श. प.)

प्रभाग ५ : अ. जाधव गायबाई रमेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), ५ ब जाधव रणबीरसीह लक्ष्मणराव (भाजप)

प्रभाग ६: अ. देशपांडे निलिमा प्रचीण (भाजप) ६ ३ धारेवाल सुमित जयेश (भाजप)

प्रभाग ७: अ. पाथरे चंचलाबाई रामदास (भाजप) ७ब मोरे दिपक नारायण (भाजप) प्रभाग ८: अ. वेग कुरेशाबी शमीम (राष्ट्रवादी श. प.) ८ ब पगारे चंद्रकांत किसन (राष्ट्रवादी श. प.). प्रभाग ९: अ. भारती शीला अभिजित (राष्ट्रवादी श. प.) ९ व कादिर शब्बीर अब्दुल ( राष्ट्रवादी श. प.)

प्रभाग १०: अ. लता शंकरराव सपकाळ (भाजप) १० व सहाणे राजाराम रामकिसन

(भाजप) या प्रमाणे निवडणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT