Blood Shortage : जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा pudhari photo
जालना

Blood Shortage : जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा

थॅलेसेमियाग्रस्तबालके, गरोदर मातांसाठी रक्तदान करा : रुग्णालय प्रशासन

पुढारी वृत्तसेवा

Severe Blood Shortage at the District Hospital

जालना, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथील रक्तपेढीमध्ये सध्या रक्ताचा अत्यंत तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढीत रक्ताचा साठा नसल्याने अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर माता आणि रक्तावरच जगणाऱ्या यॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, त्यांना सध्या रक्ताची तातडीने गरज भासत आहे.

रक्त हे कोणत्याही कारखान्यात कृत्रिमरचीी तयार करता येत नाही, ते केवळ एक माणूसच दुसऱ्या माणसाला दान करून त्याचे प्राण वाचवू शकतो. आपले अवघे १५ मिनिटे आणि काही मिलिलीटर रक्त कोणाच्या तरी घराचा दिवा विझण्यापासून वाचवू शकते. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे भावनिक आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले आहे.

१८ ते ५० वयोगटातील कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. इच्छुक दात्यांनी जालना येथील सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक येथे जाऊन रक्तदान करावे. तसेच रक्तदात्यांची संख्या पुरेशी असल्यास विविध भागात रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येईल, असे डॉ. गाडेकर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी आपले कर्तव्य बजावत स्वतः रक्तदान करावे आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१० ते १५ थैलेसमियाग्रस्त रुग्ण 66 जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या १० ते १५ लेसेमिया ग्रस्त रुग्णा आढळून आले आहेत. त्यांना नियमित रक्त पुरवठा करावा लागतो. मात्र सध्या रक्त पेढी मध्ये रक्त संकलन न झाल्यामुळे रक्त उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हाभरातील तरुणांनी रक्तदान करून या रुग्णांचा आशीर्वाद घ्यावा.
-डॉ. राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT