Jalna News : जालन्यात संत मुक्ताई दिंडीचे स्वागत file photo
जालना

Jalna News : जालन्यात संत मुक्ताई दिंडीचे स्वागत

आ. अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

Sant Muktai Dindi Welcomed in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवा संत परंपरेचा वारसा जपत भक्तिभावाने मार्गक्रमण करणाऱ्या मुक्ताबाई दिंडीचे शनिवारी जालना विधानसभा मतदारसंघात आगमन झाले असता आमदार अर्जुनराव खोतकर यांनी गोंदेगाव येथे दिंडीतील वारकरी व भाविकांचे मोठ्या उत्साहपूर्ण स्वागत केले.

दिंडीचे स्वागत पुष्पवृष्टी, हार अर्पण आणि वारकऱ्यांचा सत्कार करून करण्यात आले. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडीसोबत आलेल्या वारकरी बांधवांनी नामस्मरण, भजन व कीर्तनाच्या माध्यमातून संत मुक्ताबाईच्या शिकवणीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर, पंडितराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.. मुक्ताबाई दिंडीच्या स्वागत सोहळ्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघात भक्ती, श्रद्धा आणि संत परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT