जालना : जिल्ह्यात मार्च 2026 दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने जालना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल रु. 2 कोटी 52 लाख 89 हजार 290 इतक्या निधीस मंजुरी दिली देण्यात आली आहे. हा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील एकूण 2,857 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत. सुमारे 1498.30 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी शासनाकडे प्रपत्र अ, ब, क आणि ड अहवाल सादर करण्यात आले होते.
शासन निर्णय दि. 18 मे अन्वये संबंधित निधीस मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने संबंधित महसूल व कृषी विभागाला शासन निर्णयातील तरतुदींनुसार पात्र शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निधी वितरणाचा अहवाल त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेशही निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले आहेत.
अडीच कोटी मंजूर- अवकाळी आणि गारपिटीने मार्च महिन्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीपोटी आता जिल्ह््यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर झाले आहे. पात्र शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी