Raid on lodge in Jalna, three women rescued, three arrested
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील बसस्टैंड परिसरात लॉजमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा टाकुन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत तीन पुरुषांना जेरबंद करण्यात केले.
जालना शहरातील बसस्टँड समोरील दुर्गा लॉज येथे कुंटणखाना चालु असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्य पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला. सदर लॉज ही महेश कदम याने भाडेतत्वावर चालविण्यास घेतली होती.
तेथे त्याने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी रुम करुन बाहेरुन स्त्रीयांना आणुन वेश्या व्यवसाय सुरु केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी लॉज मॅनेजर कल्याण अंकुश लोखंडे (रा. पिरपिंपळगाव ता. जि. जालना), ग्राहक नितीन संजय साबळे (रा. नुतन वसाहत जालना), ग्राहक विकास राजेभाऊ काकड (रा. सातोना ता. परतुर, जि. जालना) यांच्यासह तिन पीडित महिला आढळून आल्या.
यावेळी ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात महीलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनीयम १९५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात अवैध वेशाव्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला आहे. बसस्थानक परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर कुंटनखाना सुरू राहात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.