Lodge Raid Pudhari Photo
जालना

Crime News : 'हॉटेल शिवराज'वर पोलिसांचा छापा; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

हॉटेल चालकासह मालक व ग्राहकावर गुन्हा, पाच महिलांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

Police raid on 'Hotel Shivraj'; High profile sex racket exposed!

जालना, पुढारी वृत्तसेवाः छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावरील गेवराई फाट्या जवळ असलेल्या 'हॉटेल शिवराज' येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर बदनापूर पोलिसांनी बुधवार, दि.२ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला. या धाडीत पोलिसांनी ५ महिलांची सुटका केली असून, यात परराज्यातील चार महिलांचा समावेश आहे. तर एक महिला परजिल्ह्यातील असल्याचे आढळून आले.

बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर आणि पोलीस निरीक्षक सुरवसे यांना गुप्त बातमीदाराकडून गेवराई फाट्यावरील 'हॉटेल शिवराज' येथे आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. यामाहितीवरुन पोलिसांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन सायंकाळी ६:३० वाजता हॉटेलवर छापा टाकला.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रुम नंबर २ ची तपासणी केली असता, तेथे एक पुरुष आणि एक महिला संशयास्पद स्थितीत आढळले. विचारपूस केली असता, संबंधित पुरुष शाम ज्ञानेश्वर देवकर (वय ३६, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) हा गिऱ्हाईक असल्याचे समोर आले.

रुम नंबर ३ ची झडती घेतली असता तेथे आणखी चार महिला आढळून आल्या. या महिला आसाम, कलकत्ता, गुजरात आणि महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये या महिलांची कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गणेश श्यामराव सावंत (हॉटेल चालक, रा. कडेगाव), औवेस सलीम खुर्चिवाला (हॉटेल मालक, रा. छत्रपती संभाजीनगर), शाम ज्ञानेश्वर देवकर (गिऱ्हाईक, रा. चिकलठाणा) या तिघांविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ आणि ५ नुसार बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक अजय जैस्वाल, पोलीस अंमलदार लोखंडे, कराड, महिला पोलीस अंमलदार जाधव आणि चालक सानप यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे करत आहेत.

२७ हजारांचा मुद्देमाल जप्त

हॉटेल चालक गणेश श्यामराव सावंत (वय ३६, रा. कडेगाव, ता. बदनापूर) हा ग्राहकांकडून पैसे घेऊन या महिलांना देहविक्रीसाठी पुरवत असल्याचे तपासात उघड झाले. महिलांच्या अंगझडतीत व हॉटेलच्या काउंटरवरून पोलिसांनी १८,००० रुपये रोख, महिलांकडील ९,००० रुपये आणि ५० रुपयांचे निरोध (कंडोम) पाकीट, असा एकूण २७,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT